मी तेव्हा सुयशचे बोलणे ऐकून पुरती गोंधळून गेले होते. अचानक गीतांजली इथे कशी काय आली, ही गीतांजली नक्की कोण? मी वाड्यात पाहिली तीच का ही? आणि हा सुयश कोण? गीतांजली बद्दल याला काय माहित आहे? सुरजला नक्की काय कळले आहे? आता विचारलेच पाहिजे. म्हणून मनातली बेचैनी चेहऱ्यावर न आणता मी सुरजला इशाऱ्याने खुणावले आणि हा नक्की काय प्रकार आहे, असं त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्यातली ती शोधक नजर पूर्णपणे सुयशवर एकवटलेली होती. त्यामुळे माझा प्रयत्न फोल गेला. तेव्हाच अचानक माझ्या सोबत असलेली मुलगी पुन्हा रडायला लागली. सुयशने तिला काही वेळ जवळ घेतले. " हि मुलगी तुमच्या सोबत आहे का?” असे मला विचारले. त्याला लहान मुलांचा लळा असावा असा काहीसा तो तिच्याशी संवाद साधत होता.
मी त्याला थोडक्यात झाला प्रकार सांगितला. त्या वर तो पुन्हा भूतकाळात गेला. आणि म्हणला “ या अपघातासारखा तो ही अपघात झाला होता आणि जान्हवीचे कुटूंब त्यात कोलमडून पडले. त्या अपघातात तिच्या जवळची व्यक्ती तिच्यापासून कायमची दूर गेली होती. जेव्हा जान्हवी कोमातून बाहेर आली तेव्हा तिची वाचा गेली. त्यावेळी गीतांजलीने कर्तव्यदक्षपणे आपली कामगिरी बजावली होती. तिने जान्हवीला जवळ जवळ त्या धक्क्यातून बाहेर काढले. ती जान्हवीची खूप प्रेमाने काळजी घेत होती. आपल्या मोठ्या बहिणीची काळजी घ्यावी अगदी तशी...” सुयश सांगत होता.
“मी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्यामुळे गीतांजली रोज माझ्या संपर्कात येत होती. तिची सेवाभावी वृत्ती पाहून मी आणखीच तिच्यात गुंतत गेलो. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आमच्यात पटकन मैत्री झाली. हळूहळू तिच्या या स्वभावामुळे जान्हवीची तब्येत देखील सुधारत होती. तिच्या चेहऱ्यावर हरवलेले हसू पुन्हा दिसायला लागले होते.”
सुयश भूतकाळात एवढा रंगून गेला आणि गीतांजलीच्या एक एक आठवणी सांगू लागला. मी फक्त ऐकत होते. माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. माझ्यासोबत असलेली ती बच्चीही आता शांत झाली होती. तिला समोरच एक बाग दिसली आणि लगेचच हात सोडून ती त्या दिशेने पळाली. तिथल्या बागेत बरीच झाडं होती.
सुयश भूतकाळात एवढा रंगून गेला आणि गीतांजलीच्या एक एक आठवणी सांगू लागला. मी फक्त ऐकत होते. माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. माझ्यासोबत असलेली ती बच्चीही आता शांत झाली होती. तिला समोरच एक बाग दिसली आणि लगेचच हात सोडून ती त्या दिशेने पळाली. तिथल्या बागेत बरीच झाडं होती.
सुयश त्या मुलीकडे आणि बागेकडे एकटक पाहत होता. मग स्वत:शीच काहीतरी बोलू लागला. “तिला फुलझाडांची, बागेची खूप आवड होती. काम उरकून ती यासाठी वेगळा वेळ ठेवायची. बागेमध्ये या झाडांना, फुलांना आपले काहीतरी गुपित ती रोज सांगायची. यावरुन माझ्या लक्षात आले की, गीतांजलीसाठी ती बाग तिच्या मनाच्या अगदी जवळची होती. तिच्या तोंडून गुलमोहराचे खूपदा कौतुक ऐकले होते. म्हणूनच मी तिला एक गुलमोहराचे झाड भेट दिले होते. तिच्या या फुलवलेल्या बागेत आम्ही ते लावले, ती त्याची जीवापाड काळजी घ्यायची नंतर ते झाड तिची आठवण म्हणून राहिले... माझ्या समोर...”, हे सांगताना सुयशच्या मनातली घालमेल सुरजला आणि मला ही जाणवत होती.
बहूतेक हेच ते गुलमोहराचे झाड, हिरवे गार व डेरेदार... अजूनही तसेच आहे. गीतांजलीने प्रेमाने त्याला वाढवले होते. सुयशशी झालेली ही भेट नक्कीच काहीतरी गूढ आहे आणि तितकेच ते एक गोड गुपित आहे. नक्की काय या काळाच्या पडद्याआड लपलेले आहे ते शोधण्याचा हा प्रवास नकळत सुरु झाला होता. तेवढ्यात हॉस्पिटलमधून सम्या, विवेक, सोमेश बाहेर आले. समोर च त्यांनी आम्हाला गाठले. सुरजने काही विचारायच्या अगोदरच विवेकने सर्व व्यवस्थित असल्याचे त्याला सांगितले. सोमेशने लगेच प्रश्नांचा भडीमार सुरु केला.
“ एवढा वेळ कुठे होतास तू? आम्ही कधी पासून शोधतोय? अचानक कसे गायब झालात तुम्ही दोघे? आणि ही लहान मुलगी, ते सर कोण आहेत? अरे सुरज बोल लवकर...!",
“ एवढा वेळ कुठे होतास तू? आम्ही कधी पासून शोधतोय? अचानक कसे गायब झालात तुम्ही दोघे? आणि ही लहान मुलगी, ते सर कोण आहेत? अरे सुरज बोल लवकर...!",
“ थांब रे जरा... त्याला बोलू तर दे...!" असे म्हणत सनिक दादाने सोमेशला शांत केले.
“ हा माझा मित्र सुयश ” अशी सुरजने एका वाक्यात ओळख करुन दिली. यावर सुयशने काहीही बोलणे टाळले आणि एक स्मित हास्य केले. तो आम्हाला दिशा दाखवत हॉस्पिटलच्या समोरच्या गेटपाशी घेऊन आला. तसे आम्ही तिथून सर्वजण हॉस्पिटलच्या मुख्य एन्ट्री पाशी आलो. त्या मुलीची आई तिथे माझी वाट पाहत होती. बराच वेळ मी तिथे नव्हते त्यामुळे ती घाबरली होती. पण मुलीला पाहिले आणि तिची चिंता मिटली.
“ आता सगळं ठीक आहे, तुम्ही हिला सांभाळून खूप मोठी मदत केली. " असे म्हणत ती आभार मानून मुलीला घेऊन तिथून निघाली.
सगळे पुन्हा पारावर जमले. सूरज कडे सर्वांचे लक्ष होते. आता मात्र सगळ्यांना उत्सुकता होती, नक्की काय चाललंय कुणालाच कळेना. मलाही पूर्णपणे काहीच माहित नव्हते. सुरजने इशाच्या बॅगेतून गीतांजलीची डायरी आणली.
No comments:
Post a Comment