कथा आणि कथेत रमणार्या काल्पनिक जगात सुचलेल्या, आठवणीत राहिलेल्या कथा एकत्र करताना जमवलेल्या गाठोड्यातल्या काही कथा कहाण्या.
Wednesday, 12 March 2025
२४. ऋण निर्देश
" फुललेला गुलमोहर - एक गुपित " पूर्ण करताना कथेची रचना आणि मांडणी करताना वेळोवेळी मिळत गेलेले मार्गदर्शन महत्वाचे होते. सुरवातीलाच कथा विश्वाची ओळख करून देण्यात श्री. नितीन चांदोरकर, सौ. दीपा ठाणेकर यांनी पुस्तकाच्या वाचन, निवडीवर मार्गदर्शन केले. त्यानंतर कथालेखन कार्यशाळेमार्फत श्री. किरण येले सर, श्री. प्रणव सखदेव यांचे मार्गदर्शन या कथेसाठी बहुमोलाचे होते.
कथेतील बारकावे टिपताना श्री चिंतामणी दातार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले सहकार्य तसेच कथा पूर्णत्वाला नेताना त्याचे व्यवसायिक मार्गदर्शन आणि पुस्तक रुपात येण्याचा प्रवास कवयित्री, लेखिका सौ.ऋतुजा देशपांडे यांनी सुलभ केला. दैदिप्य जोशी या मित्राने ही तंत्रज्ञान आणि संपर्कातून जोडणी करत यात खारीचा वाटा उचलला.
लेखन विश्वात मिळत गेलेले लेखनातील हे आणि असे अनेक दुवे हा प्रवास नक्कीच अधिकाधिक उत्तम करत आहेत. यासोबत पारिवारिक पाठिंबा आई, वडील यांनी लेखनात कळत नकळत प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुस्तकाच्या जडण घडणीत हे नक्कीच गरजेचे होते. त्यातूनच पुढे लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली.
माझ्या वाचक वर्गाने वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले आजवरचे लिखाण वाचून त्याला उत्स्फूर्तपणे दाद देत या प्रवासाला सुरवात झाली होती. त्याचेच फलित म्हणून या वळणावर ही निर्मिती करण्याचे नक्की केले. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही कथा पुढे येत आहे. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... असाच पाठिंबा मिळत राहो ही इच्छा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
सुरजचं बोलण ऐकत सनिक दादाच्या मनात सुद्धा काकांच्या अचानक गायब होण्यावरून प्रश्न पडू लागले. तो सुरजच्या शेजारीच पाठ टेकून पडला होता....
-
सूर्य हळूहळू माथ्यावर येत होता. नुकताच सगळ्यांनी चटपटीत भेळीवर ताव मारला होता. जवळपास त्याचा फडशाच पडला आणि इतकी चविष्ट भेळ खाऊन झाल...
-
मी समोर असताना सुयश सांगत होता, “ गीतांजली सोज्वळ, शांत, अल्लड व खूप प्रेमळ मनाची होती. त्या बाहेर भेटलेल्या आजी आजोबांच्या मुल...
No comments:
Post a Comment